आपला जिल्हा

येवला गुरुकुल चा आत्माविष्कार स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न

येवला गुरुकुल चा आत्माविष्कार स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न
येवला गुरुकुल चा आत्माविष्कार स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न
जाहिरात

येवला विजय कापसे दि ३ मार्च २०२६विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम  येवला गुरुकलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून आत्माविष्कार स्नेहसंमेलन व  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२६  जिजाऊ फार्म्स अँड रीसॉर्ट येवला येथे मोठ्या उत्साहात रविवार दि १ मार्च रोजी संपन्न झाला.

जाहिरात
याप्रसंगी कार्यक्रमाचे व गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, उपाध्यक्ष हेमंत शाह,प्रमुख पाहुणे म्हणून येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,माजी नगराध्यक्ष  नगरसेवक प्रवीण बनकर, नायब तहसीलदार नागपुरे मॅडम,पोलिस निरीक्षक शिवनाथ जाधव,पत्रकार सुदर्शन खिल्लारे, स्थानिक विश्वस्त मच्छिंद्र वरे व ज्ञानेश्वर वरे, जिल्हा सरचिटणीस भाजपचे आनंद शिंदे, सागर अहिरे मुख्य संपादक, आत्मा मालिक न्यूस नेहा शाह, पुरणगाव गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील, योगेश सोनवणे,राहुल नरोडे,  प्रकाश भामरे,येवला गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे, पी. आर.ओ. प्रमोद शेलार, संत कंकाली बाबा, संत सेवादास बाबा आदी मान्यवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. एकदंताय वक्रतुण्डाय कराओके,लल्लाटी भंडार सिंगिंग गणेश वंदना व जंगल थीम ( अनुराधा जोरी) आत्मा थिम, भक्त प्रल्हाद थीम (खानापुरे व टोर्पे मॅडम )धुरंदर रिमिक्स ( गायत्री वाघ ) काला चश्मा रिमिक्स (वाघ मॅडम ) स्कूल नही जाना,साउथ इंडियन( परदेशी मॅडम) छत्रपती संभाजी महाराज थीम ( शिंदे मॅडम, कुमकर मॅडम व घोडके मॅडम) मराठी सॉंग रिमिक्स( शिरसाट मॅडम ) करंट लगा रे, मोनिका सॉंग( गवळी मॅडम ) लल्लाटी भंडार (मगर मॅडम ) गोरा कुंभार थीम (पवार मॅडम )ही दोस्ती तुटायची नाही (मगर मॅडम, गायकवाड मॅडम ) ऑपरेशन सिंदूर थीम ( शिंदे मॅडम कुमकर मॅडम ) आदीनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

जाहिरात
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री खानापुरे, सोनाली घोडके, मनीषा कुमकर,योगेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेली ऑपरेशन सिंदूर, काली महाकाली, संत गोरोबा कुंभार, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा थिम यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची, सर्व पालकांची आणि उपस्थित पाहुण्यांची मने जिंकून घेतले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्राचार्य तुषार कापसे यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षिका या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे