के. जे. सोमैया महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन उपक्रम साजरा

के. जे. सोमैया महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन उपक्रम साजरा
के. जे. सोमैया महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन उपक्रम साजरा

कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२६– कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 व 5 मार्च रोजी एकात्म मानव दर्शन हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धा व व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले. एकात्म मानव दर्शन ही विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या दोनही स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची निवड जिल्हा पातळीवर संपन्न होणार्या स्पर्धेसाठी झाली आहे.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे मीडिया मॅनेजर मा.सागर आहिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मा.सागर आहिरे यांनी आपल्या मनोगतात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची व विचारांची माहिती देतांनाच एकात्म मानव दर्शनाची संकल्पना स्पष्ट केली. स्वागत मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच मार्गदर्शन सत्राचे कौतुक केले.

एकात्म मानव दर्शन ही विचारधारा एकात्मतेचा संदेश देणारी असून समाजातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत ती पोहोचली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. या मार्गदर्शन सत्रात प्रो. रविंद्र जाधव यांनी एकात्म मानव दर्शन या विषयावर आपले विचार मांडताना ही विचारधारा व आजचा समाज यावर परखड विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय दवंगे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविका कु. वैष्णवी गवळी व कु. संस्कृति चव्हाण यांनी केले. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रो. जे एस. मोरे, डॉ. एम. बी. खोसे, प्रा. एस. बी. कुटे, प्रा. किरण सोळसे, प्रा. आदिती देशमुख, प्रा. अमोल चिने, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी केले. एकात्म मानव दर्शन या उपक्रमात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान सत्रासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





