आपला जिल्हा

एकविरा क्रीडा महोत्सवात क्रिकेटसाठी १६० , रस्सीखेच २५२ व बॅडमिंटन साठी ३२७ महिला संघांचा सहभाग

एकविरा क्रीडा महोत्सवात क्रिकेटसाठी १६० , रस्सीखेच २५२ व बॅडमिंटन साठी ३२७ महिला संघांचा सहभाग

शेतकरी महिलांची क्रिकेट मैदानात बॅट घेऊन फटकेबाजी

क्रीडा महोत्सव हा महिलांसाठी आनंदाचा काळ, महिला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १० मार्च २०२६ग्रामीण भागातील महिला सहसा चूल आणि मूल व शेती यामध्ये रमलेल्या असतात. या महिलांना आरोग्य,आहार आणि व्यायामाचे महत्त्व सांगण्याबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या क्रीडा गुणांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला क्रीडा महोत्सवात क्रिकेटसाठी 160 संघ रसिकेसाठी 252 संघ तर बॅडमिंटनसाठी 327 महिला संघांचा सहभाग झाल्याने या स्पर्धा अत्यंत रोमांचकारी वळणावर पोहोचल्या आहे. शेतीमातीत राहणाऱ्या महिलांची क्रिकेट मैदानावर बॅट घेऊन होणारी फटकेबाजी पाहण्यासाठी हजारो महिला प्रेक्षकांची उपस्थिती ही लावत आहे.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षापासून भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या स्पर्धा सुरू झाली असून महिलांच्या वाढत्या सहभागामुळे दोन दिवस स्पर्धा वाढवण्यात आले आहेत. यामध्ये क्रिकेटसाठी 160 महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 2400 महिला खेळणार आहे तर रस्सीखेच साठी 252 महिला संघांचा सहभाग असून यामध्ये 2520 तर बॅडमिंटन स्पर्धेसाठी दुहेरी मध्ये 327 संघांची नोंद झाली आहे. यामधून 754 अशा एकूण 5674 महिला खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळण्यासाठी उतरत आहेत.

जाहिरात

शेती मातीत रमणाऱ्या या महिला क्रिकेटच्या मैदानावर हातात बॅट घेऊन जोरदार फटकेबाजी करत आहेत. षटकारा चौकारांची होणारी आतिषबाजी आणि गोलंदाजाने फलंदाज बाद केल्यानंतर महिलांकडून होणारा जल्लोष आणि आनंदोत्सव हा अत्यंत आनंददायी आहे.

जाहिरात

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले असून महिलांचे आरोग्य व आहाराबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. एकविराच्या क्रीडा महोत्सवामुळे संगमनेर तालुक्यातील महिलांना मोठे व्यासपीठ मिळाले असून ग्रामीण भागातील अनेक महिला एकत्र येत आहेत त्यामुळे एकमेकींच्या ओळखी होऊन मैत्री वाढत आहे. वर्षातून होणाऱ्या भेटीगाठी, आत्मविश्वासाने खेळाचा आनंद, आणि तणाव मुक्त वातावरणात महिला अत्यंत आनंददायी दिसत आहेत.

जाहिरात

हजारो महिलांचे सामने पाहण्यासाठी असणारी उपस्थिती आयोजकांकडून अत्यंत अचूक केलेले नियोजन, प्रेक्षक गॅलरी, हिरवळीवर महिलांसाठी खेळण्याची संधी, आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसन्न वातावरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले आहे. महिलांच्या दिवसेंदिवस वाढत्या सहभागामुळे पाच दिवसा ऐवजी स्पर्धा आता सात दिवसांची करण्यात आली आहे.

क्रीडा महोत्सव हा महिलांसाठी वर्षभर आनंद देणारा

आयुष्यभर शेतीत राबताना कुटुंब,  चूल आणि मूल या गरड्यात असणारी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या आहेत. क्रिकेटसाठी 160 संघांचा सहभाग असून अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व महिला मोठ्या आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहेत याचबरोबर रस्सीखेच मधून एकत्र जिंकण्याची स्पर्धा ही पाहण्यासारखी असून महिलांचा हा उत्साह नक्कीच कौतुकास्पद असून आरोग्य आहार आणि व्यायाम याचे महत्त्व महिलांना कळत आहे. या स्पर्धा त्यांना वर्षभर ऊर्जा देणाऱ्या ठरणार असून यामधून अनेक महिला एकत्र येत असून नवनवीन ओळखी होत आहे मैत्री वाढत आहे या अत्यंत सकारात्मक असल्याचे डॉ.जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे