वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण; आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव

वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण; आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२६ तालुक्यातील वारी येथे भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच तहानलेल्या वाटसरूंसाठी पाण्याचा आधार देणाऱ्या पाणपोईचा शुभारंभ रविवारी (दि.8) करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ यांच्या वतीने भरतवाडी परिसरात सलग तिसऱ्या वर्षी या मोफत पाणपोईची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, समाजाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करून स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान करण्यात आला.



या सोहळ्यासाठी ट्रस्ट व राहुल दादा मित्र मंडळाच्या स्वयंसेवकासह वारी परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कडक उन्हात सुरू झालेल्या या सेवेमुळे वारी परिसरात सध्या समाधानाचे वातावरण असून ट्रस्टच्या या सामाजिक बांधीलकीची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.




