ग्रामीण भागातील सर्व शाळांना आता सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात येणार – ना.राधाकृष्ण विखे पाटील

ग्रामीण भागातील सर्व शाळांना आता सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात येणार – ना.राधाकृष्ण विखे पाटील
ग्रामीण भागातील सर्व शाळांना आता सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात येणार – ना.राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि २१ मार्च २०२६– पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून लोणी आणि कोल्हार बुद्रूक गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा ग्रामीण भागातील पहिला उपक्रम आपल्या भागात झाला असून, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन विकास नियोजन समितीच्या माध्यमातून ही सुविधा निर्माण करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. वडगावपान येथील घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून ग्रामीण भागातील सर्व शाळांना आता सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात येणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पोलिस प्रशासनाच्या वतीने लोणी बुद्रूक, लोणी खुर्द आणि कोल्हार बुद्रूक हे तीनही गावे एकुण २०० सीसीटीव्ही कॅमेरांच्या कार्यक्षेतून पोलिस स्टेशन मध्ये जोडण्यात आले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस महासंचालक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या विचाराने सीसीटीव्ही बसविण्याची योजना संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. यापुर्वी अहिल्यानगर शहरातून याची सुरुवात करण्यात आली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात येत आहे. जिल्हृयातील ग्रामीण भागातील पहिला उपक्रम लोणी आणि कोल्हार गावातून सुरु करण्यात आला असून, ग्रामीण भागातील राज्यातील हा पहिला उपक्रम ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाच्या वतीने शिर्डी आणि अहिल्यानगर येथील पोलिस कार्यालयात दोन कमांड सेंटर यासाठी तयार करण्यात आले असून, कोणत्याही घटनेची सहज माहीती पोलिस प्रशासनाला उपलब्ध होत आहे. जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी यासर्व यंत्रणेची मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वडगावपान येथील घटना विचारात घेता जिल्ह्यातील अनेक शाळांनी सीसीटीव्ही लावलेले नाहीत हे उघड झाले. भविष्यातील धोका ओळखून ग्रामीण भागातील सर्व शाळांनी आता सीसीटीव्ही बसवून घेण्याची सक्ती करण्यात येणार असून, ग्रामपंचायतीनेही यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
पोलिस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा असा आहे की, सीसीटीव्हीची यंत्रणा उभारुन सामाजिक सुरक्षेची हमी दिली गेली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने ही यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचे सांगून घडलेल्या गुन्ह्यांची माहीती संकलित करणे, गुन्हे सिध्द करणे या तिस-या डोळ्यामुळे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन, शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधिक्षक सोमानथ घार्गे यांनी केले. कार्यक्रमास लोणी आणि कोल्हार पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



