जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी झगडे तर उपाध्यक्षपदी जाधव
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी झगडे तर उपाध्यक्षपदी जाधव
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २३ मार्च २०२६–अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे दोन्ही गट एकत्र येऊन संघटनेचे एकत्रीकरण नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, नव्या जिल्हा कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली या प्रक्रियेत श्रींगोंदा सचिन झगडे यांची जिल्हा अध्यक्षपदी तर कोपरगाव येथील सचिन विनायक जाधव यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिक्षकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
जाहिरात
सचिन जाधव यांनी यापूर्वी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केले असून, दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा व संघटन कौशल्याचा विचार करूनच त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.जाहिरात
निवडीनंतर बोलताना जाधव यांनी सांगितले की, ही केवळ पदाची प्रतिष्ठा नसून मोठी जबाबदारी आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन आणि संघटना अधिक सक्षम व एकसंघ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.जाहिरात