सरकार म्हणत गॅस मुबलक? मग गर्दी का? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल
सरकार म्हणत गॅस मुबलक? मग गर्दी का? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २३ मार्च २०२६-महिनाभरापासून इंधन पुरवठा करणाऱ्या आखाती देशात युद्ध सुरू असल्याने देशभरात इंधनाचा मोठ्या माणात तुटवडा आहे परंतु सरकार म्हणते देशभरात मुबलक प्रमाणात इंधन साठा आहे त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नये, मग गॅस वितरकांसमोर गॅस टाक्या भरायला ग्राहकांचा लांबच लांब रांगा का आहे? असा संवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना कोपरगाव शहराध्यक्ष पै.गगन हाडा यांनी कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देत शासनाला केला आहे.
जाहिरात
सदर निवेदन देते प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख पै. गगन हाडा, निखिल कंक्राळे, कान्हा हाडा, वैभव शेलार, राहुल हाडा, ऋषिकेश खैरनार, साहिल पटवेकर, विनायक टाक, स्वप्नील निरभवणे, चेतन हाडा, सोहेल पठाण, रहीम शेख, समीर पटवेकर, दिनेश वाघमारे, अथर्व कानडे, साहिल थोरात,समीर आत्तार,संदीप हाडा, सोनू निरभवणे, रितेश वाघिले, पियुष सैंदाणे, विशाल कांगणे आदि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.जाहिरात
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आखाती देशातील युद्धामुळे भारतात गॅस टांचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे परंतु शासनाने अधिकृत आपल्याकडे मुबलक गॅस उपलब्ध आहे काळजी करू नये असे सांगितले आहे तथापि कोपरगाव तालुक्यात मोठया प्रमाणात गॅस टंचाई आहे. महिनाभरापासून शहरातील सर्वच गॅस वितरकांच्या दारात भल्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. यावरून हाच प्रश्न उद्भवतो की एकीकडे सरकार सांगते टंचाई नाही मोठ्या प्रमाणात गॅस उपलब्ध आहे मग कोपरगावात कृत्रिम गॅस टंचाई निर्माण करत गॅस वितरक ग्राहकांचे जाणून बुजून शोषण करत आहेत का? हाच प्रश्न उभा राहतो.जाहिरात
त्यामुळे सरकारने एक तर गॅस टंचाई आहे हे मान्य करावे अन्यथा गॅस टाक्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करत जनसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा या मानवनिर्मित कृत्रिम गॅस टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा या निवेदनातून शासनाला दिला आहे.निवेदन देतांना