नामदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे लोणीत उद्या पासून भव्य आयोजन

नामदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे लोणीत उद्या पासून भव्य आयोजन
नामदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे लोणीत उद्या पासून भव्य आयोजन

Loni vijay kapse दि २३ मार्च २०२६– लोणी खुर्द येथील डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीने नामदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले असून, राज्यातील क्रिकेट संघ यामध्ये सहभागी होणार असल्याने स्पर्धेचे उत्सुकता चांगलीच वाढली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २ लाख रुपये ठेवण्यात आले असून, संघ मालकांसाठी कार बक्षिस देण्यात येणार आहे. व्दितीय पारितोषिक १ लाख रुपये असून, संघ मालकांसाठी युनिकॉन दुचाकी वाहन तर तृतीय पारितोषिक ७१ हजार रुपयांचे असून, यासाठी संघ मालकांना टीव्हीएस स्पोर्ट बाईक व चतुर्थ पारितोषिक ५१ हजार रुपये असून, संघ मालकांसाठी टीव्हीएस बाईक बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

सादतपुर रोडवरील बीपीएड कॉलेजच्या गणपती मंदिराच्या प्रांगणात या भव्य क्रिडा स्पर्धांचे आयोजन डे नाईट पध्दतीने करण्यात आले असून, राज्यातील संघांनी या स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणी केली आहे. स्पर्धो यशस्वी करण्यासाठी सुजय दादा विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली असून, यास्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा तसेच दिमाखदार पारितोषित वितरण समारंभ स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे.




