आपला जिल्हा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण निश्चित करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण निश्चित करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण निश्चित करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने कांदा प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी बुधवार (दि. २५) रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ. आशुतोष यांनी मुख्यमंत्र्यांकडे कांदा प्रश्नावर ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी केली.

जाहिरात

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेतील अनिश्चित दर अशा दुहेरी संकटात सापडले आहेते. कांद्याच्या दरात झालेली घसरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब बनली असून सद्यस्थितीत कांद्याला मिळणारा भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या पदरात किमान दोन पैसे पडावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कांदा प्रश्नावर योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याने कांदा उत्पादक पट्ट्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून बाजारभावातील चढ-उतार आणि निर्यात धोरण यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत शासनाने ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे  या बैठकीत केली आहे.

जाहिरात

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री ना.छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री ना. गिरीशजी महाजन,  कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवळ, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल तसेच इतरही मतदारसंघांचे विधानसभा सदस्य आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे