आपला जिल्हा

के. बी. रोहमारे महाविद्यालयात मोफत चष्मा वितरण संपन्न

के. बी. रोहमारे महाविद्यालयात मोफत चष्मा वितरण संपन्न

के. बी. रोहमारे महाविद्यालयात मोफत चष्मा वितरण संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तसेच पंचायत समिती कोपरगाव व तुलसी आय. केअर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मोफत चष्मा वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभधारक १९ विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्मिताताई रोहमारे, पंचायत समितीचे विशेष शिक्षक श्री. कांतीलाल गुरसळ, श्री. सचिन म्हस्के, तुलसी आय. केअरचे डॉ. हर्षल पाठक, उपप्राचार्य प्रा. सोनवणे बी.आर., महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे  हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते.

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बालवे एस. डी. यांनी केले. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिर व त्या अनुषंगाने मोफत चष्मा वितरण कार्यक्रमाची रूपरेषा व यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावेळी बोलताना पंचायत समितीचे श्री. गुरसळ म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे दिव्यांग व गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी हा मूळ प्रवाहातून बाजूला राहू नये यासाठी महाविद्यालय घेत असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ठाणगे म्हणाले की, विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच महाविद्यालय आरोग्याच्या दृष्टीनेही असे महत्त्वाचे उपक्रम वर्षभर राबवित असते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत महाविद्यालय नेहमी सतर्क असते व त्यासंबंधी वेळोवेळी योग्य ते पाऊले उचलत असते. भविष्यात महाविद्यालयात नेत्रदान व अवयवदान यासंबंधी जनजागृती शिबिर महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.

जाहिरात

जानेवारी महिन्यात महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिर झाले होते. त्यात महाविद्यालयाच्या जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. त्यातून लाभधारक १९ विद्यार्थ्यांना या चष्म्याचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयात पंचायत समितीच्या श्रीमती सुवर्णा मगर यांच्या निरीक्षणाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यातून सर्व गरजू विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

जाहिरात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जावेद शाह यांनी केले व आभार डॉ. दीपक बुधवंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अभिजित वाघ, प्रा. जगझाप, प्रा. जेजुरकर, प्रा.मिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे