आपला जिल्हा

संशोधनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; कोपरगावात राष्ट्रीय ई-परिषदेत प्रभावी मंथन

संशोधनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; कोपरगावात राष्ट्रीय ई-परिषदेत प्रभावी मंथन

संशोधनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; कोपरगावात राष्ट्रीय ई-परिषदेत प्रभावी मंथन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ मार्च २०२६ :उच्च शिक्षणाच्या क्षितिजावर संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप्स व बौद्धिक संपदा यांना नव्या संधींचे दालन उघडणारी “Role of Higher Education in Research, Innovation, Startups & IPR (RHERISI–2026)” ही एकदिवसीय राष्ट्रीय ई-परिषद रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील वाणिज्य, भूगोल, राज्यशास्त्र, बी.बी.ए. विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, हडपसर (पुणे) आणि चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर यांच्या सहयोगाने ऑनलाइन पद्धतीने अत्यंत उत्साहात व शैक्षणिक दिमाखात संपन्न झाली.

जाहिरात

राष्ट्रीय ई-परिषदेचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी करताना परिषदेच्या उद्दिष्टांची सुस्पष्ट मांडणी केली व संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप्स व बौद्धिक संपदेचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटन सत्रातील प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी करून दिला.

राष्ट्रीय ई-परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथील मा. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी आपल्या भाषणात उच्च शिक्षणातील संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत नाविन्यपूर्ण व प्रात्यक्षिक शिक्षण स्वीकारून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे त्यांनी नमूद केले.

जाहिरात

अतिथी सत्रात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, हडपसर पुणेचे श्री. श्रीकांत कुंदेन यांनी उद्योजकतेतील वास्तव, गैरसमज व संधी यांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. गिरीजानंदा चौधरी युनिवर्सिटी, आसाम येथील डॉ. गौर गोपाल बनिक यांनी “विकसित भारत @ २०४७” या संकल्पनेवर विचार मांडत युवकांच्या सर्जनशीलतेवर विश्वास व्यक्त केला. पुढील सत्रात लायडेनफ्रॉस्ट इनोव्हेशन्स प्रा. लि. पुणेचे श्री. आशुतोष प्रचंड यांनी “शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी नावीन्य व बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर मार्गदर्शन करून संशोधन व नवोपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले या संशोधन लेख सादरीकरणाचे अध्यक्षपद धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथील  डॉ. राजशेखर निलोलू यांनी भूषविले असून सर्व संशोधक व प्राध्यापकांना त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

जाहिरात

समारोप सत्रात श्री. आदिनाथ दामले यांनी भारतात नवोपक्रम, उद्योजकता व पेटंटचे महत्त्व स्पष्ट केले आणि पेटंट नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चं

द्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर चे प्राचार्य, डॉ. संजय कांबळे यांनी संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता यांचा समन्वय साधण्याची गरज अधोरेखित केली. तसेच उच्च शिक्षण संशोधनाभिमुख, कौशल्याधारित व आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रीय ई-परिषदेचा अहवाल डॉ. अर्जुन भागवत यांनी सादर केला, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा गव्हाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चैताली वाघ व प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले. परिषदेसाठी डॉ. चंद्रभान चौधरी, डॉ. देविदास रणधीर, प्रा. तानसेन रणदिवे, प्रा. दिलीप भोये यांच्यासह वाणिज्य, भूगोल, राज्यशास्त्र आणि बी.बी.ए. विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकांचे सहकार्य लाभले व तांत्रिक सहाय्य श्री. गणेश जगताप यांनी केले.

तसेच राष्ट्रीय ई-परिषदेच्या यशस्वीतेसाठी कला शाखेचे उपप्राचार्य, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य, डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, डॉ. निलेश मालपुरे आणि कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांनी मोलाचे सहकार्य केले. ही राष्ट्रीय ई-परिषद ऑनलाईन यशस्वीरीत्या पार पडली असून देशभरातून प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ७५ संशोधन लेख प्राप्त झाले असून ते ‘बुलेटीन ऑफ नेक्सस (USA)’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे