व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन
व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन
व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन

Kopargaon vijay kapse दि २७ मार्च २०२६–कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनुभवी व अभ्यासू नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश (काका) कोयटे, कार्याध्यक्षपदी अजित लोहाडे व सुधीर डागा, तर उपाध्यक्षपदी संजय भन्साळी आणि एस.जे.एस हॉस्पिटलचे चांगदेव कातकडे यांची निवड झाली आहे. या नूतन कार्यकारणीसह निवड झालेल्या सर्व सदस्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपरगावची बाजारपेठ अधिक समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शहराचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे शहराबाहेरील व्यापारी आता व्यवसायानिमित्त कोपरगाव शहरात येत आहेत. यामुळे शहराची व्यावसायिकता वाढत असून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित करून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला असल्याने कोपरगावची बाजारपेठ गजबजली आहे. याचा शहराच्या अर्थ व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शहरामध्ये व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी नवीन व्यापारी संकुले उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे आगामी काळात कोपरगावची बाजारपेठ एक महत्त्वाचे व्यापार केंद्र म्हणून ओळखली जाईल.

कोपरगाव शहराला विकसित करण्यासाठी महायुती शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शहराचा चेहरामोहरा बदलवला आहे. यापुढे हि शहर विकासाची कामे अविरतपणे सुरु राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. तसेच नूतन कार्यकारणीत युवा व्यावसायिकांना संधी दिली आसल्यचा आनंद व्यक्त करत व्यापारी महासंघ शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न तळमळीने सोडवत आहे. याचा अभिमान वाटत असून या पुढील काळातही व्यापारी महासंघ असेच काम करीत राहिला असा विश्वास व्यक्त करून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघच्या नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




