चिंचपूर येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार- शालिनीताई विखे

चिंचपूर येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार-शालिनीताई विखे
चिंचपूर येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार-शालिनीताई विखे

Loni vijay kapse दि २९ मार्च २०२६– चिंचपूर येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिले.

चिंचपूर येथील आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने सौ.विखे पाटील यांची भेट घेवून स्मशानभूमीच्या जागेची समस्या मांडली. याबाबतची सर्व माहीती जाणून घेत त्यांनी या जागेच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने निश्चित मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले.

चिंचपूर येथे अनेक वर्षांपासून आदिवासी समाजा करीता स्मशानभूमीला देण्यात आलेल्या जागेबाबत काही अडचणी निर्माण झाल्याने समाजासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर सर्व वस्तुस्थिती जाणून घेवून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची माहीती सौ.विखे पाटील यांनी दिली.





