आपला जिल्हा

स्नेहलताताई कोल्हे यांच्या दूरदृष्टीने हद्दवाढ भागाची विकासकामे मार्गी : नगराध्यक्ष संधान 

स्नेहलताताई कोल्हे यांच्या दूरदृष्टीने हद्दवाढ भागाची विकासकामे मार्गी : नगराध्यक्ष संधान 
हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध : पराग संधान
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपरिषद हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या, हद्दवाढ भागातील धोंडीबा नगर व हनुमाननगर येथील, अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष पराग संधान हस्ते तसेच स्थानिक नागरिक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात
सदरील भाग हा त्रिशंकू भाग होता परंतु, कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून आणि प्रयत्नातून या भाग कोपरगांव नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आला.युवानेते विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी या भागात सुविधा मिळाव्यायासाठी सातत्याने प्रश्नांची दखल घेत सूचना केल्या.त्या प्रमाणे शासनाचा या भागाच्या विकासासाठी मिळणारा हक्काच्या निधीतून सदर कामांची सुरवात करण्यात आली आहे.

जाहिरात
हा दिवस अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा आहे. कोपरगाव नगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हद्दवाढ भागातील धोंडीबा नगर आणि हनुमान नगर या परिसरात अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ  सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची अपेक्षा होती, पावसाळ्यात होणारी गैरसोय, दैनंदिन जीवनातील अडचणी सर्वांनी अनुभवलेल्या आहेत. आज त्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची सुरुवात झाली, याचा मनापासून आनंद होत आहे.

जाहिरात
या कामाच्या निमित्ताने उपस्थित सर्व नागरिकांचे, स्थानिक बांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो असे संधान म्हणाले. आपले सहकार्य, विश्वास आणि पाठिंबा यामुळेच अशी कामे शक्य होत आहेत. पुढील काळातही अशाच विकासकामांच्या माध्यमातून आपण आपल्या कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, कारण आता थांबायच नाही असे आपण सुरू केले आहे.
या प्रसंगी, आरोग्य सभापती वैभव आढाव, वैभव गिरमे, दीपक जपे, राहुल खरात, नवनाथ आढाव, अरुण शेळके,अशोक थोरात, लहानु वाळुंज,संजय धनजे, राजेंद्र धनगे, कैलास सोमासे,अनिल भासले,सुमनताई मोगल,कल्पेश नरोडे, कालिदास पवार,पंडित पवार, मारुती सराटे, संतोष जाधव,राम पाटील, केशव बटवाल, वाल्मीक माने, सुनील महाले, गणपतराव बोर्डे,सुनील महाले, सोमनाथ नगरे, पोपटराव पवार,सागर आढाव तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे