आपला जिल्हा

के.जे.सोमैया महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये अतिथी व्याख्यान संपन्न  

के.जे.सोमैया महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये अतिथी व्याख्यान संपन्न  

के.जे.सोमैया महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये अतिथी व्याख्यान संपन्न  

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ८ एप्रिल २०२६- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये दिनांक १८ मार्च रोजी प्राण्यांची उत्क्रांती या विषयावरील व्याख्यान यशस्वी रित्या संपन्न झाले.  सदर अतिथी व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या मा. अंकिता प्रसाद, सहाय्यक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव या होत्या.

जाहिरात

सदरील व्याख्यानामध्ये त्यांनी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना प्राण्यांची उत्क्रांती त्यामध्ये मुख्यत्वे करून अपृष्ठवंशीय प्राणी, व त्यांचे वेगवेगळे ग्रुप, तसेच त्यांचे वर्ग व निसर्गामधील त्यांचे योगदान याबद्दल सविस्तर असे विवेचन केले तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या चिकित्सक वृत्तीला चालना देण्याची आवश्यकता यामध्ये त्यांनी नमूद केली तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या विविध प्राण्याबद्दल माहिती घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

जाहिरात

सदर अतिथी व्याख्यानाच्या उपक्रमाला को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीव दादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे व प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. डी गवळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राणिशास्त्र विभागातील प्रा. शिंदे, प्रा. भडांगे, प्रा. मोरे, प्रा. खाडे, प्रा. कोकाटे व. प्रा. धांडे यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच प्रयोगशाळा परिचर नितीन कुलकर्णी यांची मदत लाभली. प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सदरील कार्यशाळेचा लाभ घेतला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे