आपला जिल्हा

१३१ कोटीच्या पाणी योजनेच्या महत्वाच्या असलेल्या ब्रिजलालनगरच्या पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी-विरेन बोरावके

१३१ कोटीच्या पाणी योजनेच्या महत्वाच्या असलेल्या ब्रिजलालनगरच्या पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी-विरेन बोरावके

१३१ कोटीच्या पाणी योजनेच्या महत्वाच्या असलेल्या ब्रिजलालनगरच्या पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी-विरेन बोरावके

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ एप्रिल २०२६: कोपरगाव शहरातील नागरीकांना दिलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी देवून आमदार आशुतोष काळे यांनी पूर्ण केला आहे. ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे कधी एकवीस दिवसांनी तर कधी सोळा दिवसांनी मिळणारे पाणी आता कोपरगावकरांना चार दिवसाआड मिळत आहे. हे पाणी नियमित मिळावे हे आमदार आशुतोष काळेंचे स्वप्न आहे.त्या स्वप्नपूर्तीकडे पहिले पाऊल पडले असून कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठा योजनेतील मंजूर असलेल्या ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते व नगरसेवक विरेन बोरावके यांनी दिली आहे.

जाहिरात

कोपरगाव शहराचा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटी निधी दिला आहे. या निधीतून ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीबरोबरच९५ किलोमीटरची नवीन पाईपलाईनपाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगरब्रिजलाल नगरगोरोबा नगर, मोहनीराज नगर  साईबाबा कॉर्नर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. साठवण तलावाचे काम पूर्ण होवून वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्यात आले असून या पाणी योजनेसाठी कोपरगाव शहरात विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

जाहिरात

यामध्ये कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीचा समावेश आहे. या टाकीचे काम पूर्ण झाले असून नुकतीच घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. या ब्रिजलाल नगरच्या पाण्याच्या टाकीतून ब्रिजलाल नगरबरोबरच माधव नगर, शंकर नगर, गवारे नगर, ओम नगर, श्रद्धा कॉलनी, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी या भागातील नागरीकांना पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेच्या दृष्टीने हि अत्यंत महत्वाची बाब असून लवकरच नागरीकांना नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते व नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

जाहिरात

उर्वरित चार तलावांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना

 कोपरगाव शहराचा पुढील ५० वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही हि दूरदृष्टी ठेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून कोपरगाव शहरासाठी  यापूर्वी आरक्षित असलेले ५.९६ एमएलडी पाणी यामध्ये वाढ करून ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित करून घेतले आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या एक ते चार साठवण तलावाचा गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे प्रस्तावित होते. परंतु ५ नंबर साठवण तलावाप्रमाणेच या चारही साठवण तलावांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.त्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळविण्यासाठी आमदार आशुतोष काळे पाठपुरावा करणार आहेत. ५ नंबर साठवण तलावाप्रमाणेच चारही साठवण तलावांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण होवून निश्चितपणे साठवण क्षमता वाढणार असून कोपरगाव शहरतील नागरीकांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे. – विरेन बोरावके(माजी गटनेते व नगरसेवक)

विरेन बोरावके

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे