आपला जिल्हा

कोपरगावची कन्या जीएसटी सहाय्यक अधिकारी झाल्याचा अभिमान ;मा.आ.स्नेहलताताई कोल्हे 

कोपरगावची कन्या जीएसटी सहाय्यक अधिकारी झाल्याचा अभिमान ;मा.आ.स्नेहलताताई कोल्हे 
कोपरगावची कन्या जीएसटी सहाय्यक अधिकारी झाल्याचा अभिमान ;मा.आ.स्नेहलताताई कोल्हे 
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १० एप्रिल २०२६- लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोपरगावची कन्या  स्नेहल अशोक आहेर हिने उत्कृष्ट यश संपादन करत जीएसटी सहाय्यक अधिकारी पदावर नुकतीच नियुक्ती मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. स्नेहल आहेर तसेच तिचे आई वडील यांचा मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या स्नेहल आहेर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तिच्या या यशामुळे संपूर्ण कोपरगावकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सत्कार सोहळ्यात काढले.

जाहिरात
सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्नेहलने हा टप्पा गाठला असून तिच्या या प्रवासात वडील अशोक आहेर व आई यांचा खंबीर पाठिंबा लाभला. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत तिने जीएसटी सहाय्यक अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.यावेळी कु. स्नेहल आहेर हिचा सन्मान स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिनदादा कोल्हे, अतुल सुराळकर, किरण गायकवाड तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे