आपला जिल्हा
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पाच पैकी दोन जागेवर काळे गटाचे उमेदवार बिनविरोध

Kopargaon vijay kapse दि १७ एप्रिल २०२६– कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पाच जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतांना अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे काळे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर कोल्हे गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असून दोन ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.





