आपला जिल्हा

संजीवनी अकॅडमीचा कृष्णा नवले सीबीएसई परीक्षेत  ९८. ४०  टक्के गुण मिळवुन प्रथम

संजीवनी अकॅडमीचा कृष्णा नवले सीबीएसई परीक्षेत  ९८. ४०  टक्के गुण मिळवुन प्रथम

 


                ५८ विद्यार्थी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन उत्तिर्ण, १०० टक्के निकालाची परंपरा कायम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १७ एप्रिल २०२६- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  (सीबीएसई-केद्रिय माध्यमिक शिक्षण  मंडळ) फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये इ. १० वीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे.  यात कृष्ण संतोष  नवले याने शेकडा  ९८.४०  टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले  व प्रथम क्रमांक मिळविला.. यात ९५ ते १०० टक्के गुण मिळविणारे २४ विद्यार्थी आहेत तर ९० ते ९४ टक्के गुण मिळविणारे  ३४ विद्यार्थी आहेत. असे ५८ विद्यार्थी ९०  टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन उत्तिर्ण झाले आहेत. यंदाही संजीवनी अकॅडमीने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेली आहे. अशा  प्रकारे संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संजीवनी मधुन मिळालेल्या दर्जेदार शिक्षणावर  मोहर उमटवली.

जाहिरात

   या परीक्षेमध्ये संस्कृती अतुल इनामके हीने  ९८ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटाकाविला. सुयोग गजानन चौधरी व प्रथमेष संतोश डोखे यांनी प्रत्येकी ९७. ८० टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला तर प्रिशा  राहुल बजाज, ईश्वरी  सतिश  इंगळे व साईश तुषार  गलांडे यांनी प्रत्येकी ९७. ६०  टक्के गुण मिळवुन ते चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.

जाहिरात

विशेष  म्हणजे संस्कृती अतुल इनामके, प्रथमेश संतोष डोखे, सुयोग गजानन चौधरी, ईश्वरी  सतिश  इंगळे, वल्लभ निलेश शेळके, प्रेम विजय भास्कर, सानवी संग्राम ताम्हणे व स्वरूप अनिलकुमार इंगळे यांनी मराठी विषयात १००  पैकी १०० गुण मिळवुन मराठीची अस्मिता जागविली तर कृष्णा संतोष  नवले, संस्कृती अतुल इनामके, सुयोग गजानन चौधरी, प्रथमेश  संतोष  डोखे, प्रिशा राहुल बजाज, साई तुषार  गलांडे, ईश्वरी सतीश  इंगळे, नेहा गुरूबचन गुरली, मिहिका चेतन काले, सार्थक विशाल जपे, अमेय दिपक गाडे व प्रथमेश  दीपक काजळे यांनी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात १००  पैकी १०० गुण मिळवुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे सिध्द केले. या सर्व विद्यार्थ्यांना हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , डायरेक्टर ऑफ ऑडीट सुंदरी  सुब्रमण्यम व संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या अनुश्रिता सिंह यांचे मार्गदर्शन  लाभले.

संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे भाग्यवान पालक यांचे अभिनंदन केले आहे.

संजीवनी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांसाठी  पालकांचे नेहमीच सहकार्य मिळत असुन प्रत्येक यशामागे   विद्यार्थी व पालकांसह शिक्षकांचाही महत्वपूर्ण भूमिका असते. यामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिक  गुणवत्तेमध्ये अग्रेसर नाही तर क्रीडा, देश व राज्य  पातळीवरील तांत्रिक स्पर्धा,  सांस्कृतिक, निबंध, वक्त्कृत्व अशा  अनेक स्पर्धांमध्ये यशाला गवसणी घालतात. या सर्व बाबींमुळे संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक क जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.-डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स्.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे