आपला जिल्हा

संजीवनी आयुर्वेदा काॅलेजची प्रीता शेजवळ राज्यस्तरीय राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम

संजीवनी आयुर्वेदा काॅलेजची प्रीता शेजवळ राज्यस्तरीय राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम


                           विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिलेल्या संधीचे यश

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २६ एप्रिल २०२६:  संजीवनी आयुर्वेदा काॅलेज अँड  रिसर्च सेंटरच्या प्रीती अनिल शेजवळ हीने सोलो वेस्टर्न व्होकल या गायन प्रकारात महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ  हेल्थ सायन्स आयोजीत ‘युथ फेस्ट २०२६’ अंतर्गत ‘स्पंदन २०२६’ या राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनी आयुर्वेदा काॅलेजच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. तर याच स्पर्धेत श्रुती नामदेव पठारे हीने सोलो लाईट इंडियन व्होकल या गायन प्रकारात तृतिय क्रमांकावर आपली मोहर उमटवुन राज्यात संजीवनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिध्द केले.

जाहिरात

स्पंदन २०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातुन ३० पेक्षा अधिक आयुर्वेदा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा सिन्नर येथे सपन्न झाल्या. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विध्यार्थ्यांच्या  व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू विकसित करण्यासाठी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासक्रमासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून संस्थेचे नाव उंचावत आहेत.वैद्यकिय शिक्षणातुन सक्षम डाॅक्टर झाडविण्याबरोबरच विद्यार्थी उत्तम नागरीक घडावेत यासाठी संजीवनी नेहमी कटीबध्द असते.

जाहिरात

संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य डाॅ. रामेश्वर  पवार, नाॅन अकॅडमिक संचालक डी. एन. सांगळे, संगीत शिक्षक  शुभम जाधव व महेश  गुरव आणि समन्वयक डाॅ. साईबन मसने व डाॅ. यितल अष्टेकर  यांचेही अभिनंदन केले.

जाहिरात
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचा सत्कार केला. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे