आपला जिल्हा

संवत्सर मध्ये गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

संवत्सर मध्ये गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

जलव्यवस्थापन उपक्रमासाठी जनतेच्या सक्रीस सहभागाची गरज – ना. विखे पाटील

जाहिरात

Kopargaon vijay kapse  दि २७ एप्रिल २०२६राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जात आहेत. मात्र जनतेचा सक्रीय सहभाग आणि सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचे प्रश्न संपणार नाहीत. भविष्यातील पाण्याचे गांभिर्य लक्षात घेऊन जनतेने शासनाच्या जलव्यवस्थापन उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवत्सर येथील जलयात्रेच्या स्वागत कार्यक्रमातून केले.

जाहिरात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यांतर्गत जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दि. २५ ते २९ एप्रिल २०२६ या दरम्यान गोदावरी ते नर्मदा जलयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेचे सोमवारी कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे आगमन झाले. यावेळी फाटाक्याच्या आतशबाजीत व फुलांच्या वर्षावात जलरथाचे स्वागत करण्यात आले. ना. विखे पाटील यांच्यासमवेत राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, आ. गोपीचंद पडळकर, शेतकरी नेते व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. संवत्सर चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कार्यक्रमात प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन ना. विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंदजी महाराज, संवत्सर महानुभाव आश्रमाचे महंत राजधरबाबा यांनी संयुक्तरित्या ना. विखे पाटील यांचा सत्कार केला.

जाहिरात

जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीचा संदेश देण्याच्या उद्देशाने जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या सक्रीय सहभागातून जलसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होऊन राज्यभर जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा व्यापक संदेश या जलयात्रेतून देण्यात येत असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले. जलयात्रा ही केवळ यात्रा नाही तर, पाणी वाचविण्यासाठी सामुहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी एक ऐतिहासिक आणि व्यापक अशी चळवळ आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असल्याचा संदेश या जलयात्रेद्वारे समाजातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही ना. विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. महाराष्ट्रातील शेती सिंचनाच्या पाण्यासाठी पद्मभुषण माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील, कै. गणपतराव देशमुख, कोपरगांवचे नेते स्व नामदेवराव परजणे आण्णा यांनी सतत पाठपुरावा केला, अनेक आंदोलने केली याचीही आठवण ना. विखे पाटील यांनी यावेळी करुन दिली.

जाहिरात

आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जलयात्रेचा उद्देश विषद केला. महाराष्ट्रात धर्मरक्षणाचे काम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. जलव्यवस्थापन हा अहिल्यादेवींचा मुख्य संदेश आणि उपक्रम होता असेही ते म्हणाले.

जलयात्रेच्या स्वागतासाठी नानासाहेब सिनगर, खंडू फेपाळे, सोमनाथ निरगुडे, एस. के. थोरात, बाळासाहेब थोरात, गोपीनाथ केदार, सोपान चांदर, बद्रीनाथ वलटे, कैलास मढवे, सीताराम कांडेकर, यशवंतराव गव्हाणे, अशोकराव काजळे, रोहीत टेके, राजेंद्र काजळे, प्रभाकर घाटे, गोरखनाथ शिंदे, जगदीप रोहमारे, भिकाजी झिंजुर्डे, भाऊसाहेब कदम, दत्तात्रय शितोळे, सुदाम शिंदे, सुदामराव कोळसे, सयराम कोळसे, उत्तमराव माने, बाळासाहेब सोनवणे, विकास निकम, शिवनाथ खिलारी, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, रमेशराव गायकवाड, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव साबळे, दिलीपराव ढेपले. फैयाजखान पठाण, बाबासाहेब फटांगरे, संदीप गुडघे, विजय जगताप, दगू गुडघे, कारभारी भाकरे, सूर्यभान परजणे, दत्तात्रय शेटे, संजय टुपके, अशोक दुपके, लक्ष्मणराव शिंदे, विकास आढाव, शरदराव शिंदे, सचिन अजमेरे, रविंद्र आढाव, राहूल आढाव, शामकर्ण होन, भास्करराव दुकळे, नामदेव शिंदे, नामदेव पावडे, भिकाजी कर्पे यांच्यासह पाटबंधारे विभाग, पंचायत समितीचे अधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे