संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी ज्यु. कॉलेजचा अनिकेत साळुंके  जेईई मेन्स मध्ये  ९९. १० पर्सेन्टाईल मिळवुन सर्व प्रथम

संजीवनी ज्यु. कॉलेजचा अनिकेत साळुंके  जेईई मेन्स मध्ये  ९९. १० पर्सेन्टाईल मिळवुन सर्व प्रथम


एकुण  २४  विद्यार्थी जेईई  अॅडव्हान्सड् परीक्षेसाठी पात्र

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २९ एप्रिल २०२४नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने देश  पातळीवर घेतलेल्या जेईई मेन्स २०२४ परीक्षा दोन टप्यांमध्ये घेतती होती. या  परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झालेे. यात अनिकेत एकनाथ साळुंके या विद्यार्थ्याने जेईई मेन्स मध्ये ९९. १० पर्सेन्टाईल गुण मिळवुन संजीवनीमध्ये सर्व प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे २४  विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड् परीक्षेसाठी पात्र झाले आहे, अशी  माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जाहिरात

         जेईई अॅडव्हान्सड् परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा पढील प्रमाणे समावेश  आहे. कंसातील आकडे त्यांनी जेईई मेन्स मध्ये मिळविलेले पर्सेन्टाईल गुण आहेत. अनिकेत एकनाथ साळुके (९९. १०), प्रज्योत पतींग मोरे (९९. ०९, भावेश  सतिष  देवरे (९७. ५०), सौरभ रमेश  गांगुर्डे (९६. ८८), अंजली सतिष  चोळके (९६. ६९), ओम अशोक  व्हर्गळ (९६. ३०), साईश  राजेंद्र गायकवाड (९५. २४), दर्शन  संजय कंक्राळे (९३. २५), साई योगेश  टोनपे (९२. १५), दिपेश  मंगेश  नागपुरे (९०. ८३), क्षितिज विशाल  चव्हाण (९०. १९), सारंग बाळासाहेब पाचोरे (८६. ५७), प्रणाली बाबासाहेब परजणे (८६. ००), रोहित प्रकाश  सोमासे (८५. ४४),आदित्य महिंद्रा वाघमारे (८५. ४२), विकास भागवत डांगे (८५. १३), सह्यााद्री भाऊसाहेब शिंदे  (८२. १७), आदित्य मयुर गोरे (८१. ६८), ओंकार शिवाजी  जपे (८१. ५७), प्रतिक सुभाष  गाढवे (८१. ४६), गारगी प्रशांत  सुराळकर (८१. १२), श्रीकांत सुरेश  काळे (८१. १२), यशराज रामनाथ जाधव (७९. ७५) व सुरज बाबासाहेब त्रिभुवन.यातील ११ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेन्टाईलस् पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये चांगली तयारी करून घेण्यात आली. वरील विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड् उत्तिर्ण झाल्यास ते इंजिनिअरींगशिक्षणासाठी देशातील  आयआयटी, एनआयटी, अशा  संस्थामध्ये प्रवेशासाठी पात्र होतील. नाहीतर त्यांना जेईई मेन्सच्या गुणांवर देशातील  नामांकित इंजिनिअरींग कॉलेजेस मध्ये प्रवेशास  पात्र झालेच आहे.

जाहिरात

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे , मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे  यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्सड् परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

अनिकेत एकनाथ साळुंके

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे