आपला जिल्हा

माध्यमिक विद्याभवन अमृतनगर शाळेची  १०० % निकालाची परंपरा कायम

माध्यमिक विद्याभवन अमृतनगर शाळेची  १०० % निकालाची परंपरा कायम

माध्यमिक विद्याभवन अमृतनगर शाळेची  १०० % निकालाची परंपरा कायम

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ८ मे २०२६- अमृत सांस्कृतिक मंडळ अमृतनगर, संगमनेर संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्याभवन अमृतनगर या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षा मार्च 2026 चा निकाल 100% लागला आहे. विदयालयाने याही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

जाहिरात

माध्यमिक विद्याभवन विद्यालयाचा मार्च 2026 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक कुमारी अदिती शशिकांत बड 91.20% व्दितीय क्रमांक चि. अविनाश दिपक वानखेडे 90%, तृतीय क्रमांक कु. साक्षी संतोष पुणेकर 83.80%, चौथा क्रमांक कुमारी तमन्ना शानुर शेख 83.40%, व पाचवा क्रमांक कु. भाग्यश्री निलेश पारधी 82% या सर्व विद्यार्थ्यांचे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन लोकनेते मा. बाळासाहेब थोरात साहेब, मा. महसुल मंत्री, विधान परिषदचे सदस्य आमदार मा. सत्यजित दादा तांबे साहेब, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. श्री पांडुरंग दामोधर घुले कार्यकारी संचालक मा. श्री जगन्नाथ भाऊराव घुगरकर साहेब, अमृत सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष मा. श्री रामदास गोपाळराव तांबडे, सेक्रेटरी मा.श्री संदिप बंडु दिघे, खजिनदार मा.श्री भारत जगन्नाथ देशमुख व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता म्हस्के मॅडम, प्राथमिक विदयाभवनच्या मुख्याध्यापिका अर्चना आंबरे मॅडम व शिक्षक वृदं व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले.

जाहिरात

या सर्व गुणी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीम संगिता म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक श्री राजु बड, श्री उत्तम गंवादे, श्री जैनुद्दीन तांबोळी, श्री इंद्रभान शिंदे व श्री दिपक आदमाने, श्री चांगदेव जोंधळे तसेच प्राथमिक व माध्यमिक विदयाभवनचे सर्व शिक्षक वर्ग या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सर्व शिक्षकांचे परिश्रमामुळे व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच पदाधिकारी व पालकांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्या मुळे विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.

जाहिरात

विदयालयात उत्तम अनुभवी शिक्षक वर्ग असून शाळेत सर्व भौतिक सुविधांची उपलब्धता, सुसज्ज मैदान, प्रशस्त इमारत, सुसज्ज वर्ग खोल्या आधुनिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध आहेत. शिस्तबध्द व संस्कारक्षम शैक्षणिक वातावरण, विदयार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, पालकांशी सुसंवाद, शाळेत सर्व सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे परिसरातील पालकांचा व विदयार्थ्याचा शाळेवर विश्वास आहे. या सर्व बाबींचे फलित म्हणजे विदयालायाची निकालाची परंपरा कायम आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे