आपला जिल्हा

आमदार विवेक कोल्हे यांचा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगावात

 आमदार विवेक कोल्हे यांचा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगावात

आमदार विवेक कोल्हे यांचा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगावात

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ मे २०२६महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झालेले युवा आमदार विवेक कोल्हे यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पाहण्यात येणार आहे. बुधवार दि. १४ मे रोजी मुंबई येथे पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप तसेच भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

यावेळी मतदारसंघातील विविध भागांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. युवा नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांची विधान परिषद सदस्यपदी झालेली निवड ही कोपरगावसह विविध जिल्ह्यात समर्थकांनी अभिमानाची बाब मानली जात असून त्यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

जाहिरात

कलश मंगल कार्यालय येथे मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून उपस्थितांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत.

जाहिरात

विवेक कोल्हे यांच्या निवडीमुळे विविध भागातील विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे