आपला जिल्हा

आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले.

आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले.

शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी राज्यात प्रथम गुरूकुलाचे 384 विद्यार्थी परीक्षेत पात्र

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० मे २०२६- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमने मिळवीला. या विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी पात्र ठरले. हि संख्या राज्यात सर्वाधिक आहे. अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. ते म्हणाले,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत पात्र ठरलेल्या ३८४ विद्यार्थ्यांत १० विद्यार्थ्यांनी अडिचशेहून अधिक, ७८ विद्यार्थ्यांनी दोनशेवीसहून अधिक तर १४२ विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक तर २२४ विद्यार्थ्यांनी १८० हून अधिक गुण प्राप्त केले. इयत्ता आठवी मध्ये तेजस चोंडगीर २६४ , मंगेश कदम २६२ , वैभवी जाधव २६० , करण चरवांडे २५८ , धनंजय दहिफळे २५४ तर स्वराली काळे २५२ गुण मिळवीले. इयत्ता पाचवीत सार्थक जोरवर २५६ , भूषण धोणे २५४ , सार्थक शिंदे २५४ , युवराज गर्जे २५० ,संकेत साप्ते २४८ , आर्यन वाळेकर २३८ , प्रद्युम्न घुमरे २३६ गुण मिळवीले.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 आत्मा मालिक पॅटर्न चे यश आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा व शालेय परीक्षांमध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे सातत्याने राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. त्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे.

नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष विश्वात्मक, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट)

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे