आपला जिल्हा

गौतम पब्लिक स्कूलच्या अल्फा कंपनीने  महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक शिबिरात पटकावली चॅम्पियन ट्रॉफी

गौतम पब्लिक स्कूलच्या अल्फा कंपनीने  महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक शिबिरात पटकावली चॅम्पियन ट्रॉफी

गौतम पब्लिक स्कूलच्या अल्फा कंपनीने  महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक शिबिरात पटकावली चॅम्पियन ट्रॉफी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० मे २०२६- कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सीएटीसी २०७/५७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक ट्रेनिंग कॅम्प ११ ते २० मे या कालावधीत अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात

या १० दिवसीय शिबिरामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील २८ शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी आणि १५ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी आणि महाविद्यालयातील एनसीसीचे एकूण ४०२ विद्यार्थी सहभागी झाले असून यामध्ये २६२ मुले आणि १४० मुलींचा समावेश होता. या संपूर्ण शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि लष्करी प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावत गौतम पब्लिक स्कूलच्या अल्फा कंपनीने जनरल चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यावेळी विद्यार्थ्यांना सुभेदार मेजर राजेंद्र सिंग, सुभेदार राजू भालेराव, हवालदार नितीन आणि सी.टी.ओ.इसाक सय्यद यांनी प्रशिक्षण दिले.

जाहिरात

या ट्रेनिंग कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम, परेड, रायफल चालविणे प्रशिक्षण, नकाशा वाचन, जर्निंग डीस्टंन्स, फिल्ड ग्राम, हेल्थ आणि आयजीन या विषयांचे प्रशिक्षण दिले गेले. तसेच सेंन्ट्रल लेक्चरमध्ये आगीपासून बचाव करणे, वन विभागाच्या माध्यमातून जंगलातील प्राण्यांची ओळख आणि प्राण्यांच्या हल्ल्यातील प्राथमिक उपचार प्रशिक्षण, परिवहन विभागाकडून आपत्कालीन वाहतूक नियम आणि वाहन चालवण्याचे प्रशिक्षण ही दिले आहे. देशात राज्यात अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीत नागरिकांची सुरक्षा आणि बचाव करण्यासाठी या ट्रेनिंग कॅम्पचे केंद्र शासनाकडून आयोजन करण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी आता कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाऊ शकतात आणि नागरिकांची रक्षा करू शकतात असा विश्वास कॅम्प कमांडर कर्नल आशिष रैना यांनी व्यक्त केला.

जाहिरात

शिबिरादरम्यान प्रशिक्षणाची पाहणी करण्यासाठी संभाजीनगर येथील ब्रिगेडियर ए. आर. बारबरे यांनी संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसोबत घालवत त्यांना प्रशिक्षण दिले. ब्रिगेडियर बारबरे यांनी शालेय परिसर, तिथे उपलब्ध असलेल्या उत्तम सुविधा आणि शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाचे भरभरून कौतुक केले. तसेच हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, प्राचार्य नूर शेख व संपूर्ण गौतम परिवाराचे विशेष आभार व्यक्त केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्यासह आदी मान्यवरांनी शिबिरास सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गौतम पब्लिक स्कूलच्या अल्फा कंपनीच्या २१ विद्यार्थ्यांनी रायफल चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सौ.चैतालीताई काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या प्रशिक्षण शिबिराची सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आणि पारितोषिक वितरणाने झाली. गौतमच्या अल्फा कंपनीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी प्राचार्य नूर शेख, सी.टी.ओ. इसाक सय्यद, सर्व मार्गदर्शक आणि एनसीसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे