आत्मा मालिकच्या दीक्षा अहिरेचे जेईई मेन परीक्षेत उल्लेखनीय यश

आत्मा मालिकच्या दीक्षा अहिरेचे जेईई मेन परीक्षेत उल्लेखनीय यश
आत्मा मालिकच्या दीक्षा अहिरेचे जेईई मेन परीक्षेत उल्लेखनीय यश

Kopargaon Vijay Kapse दि १६ जुन २०२६– आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज ची विद्यार्थिनी दीक्षा राहुल अहिरे हिने JEE Main परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. गुणवत्तेच्या आधारे नागपूर येथील प्रतिष्ठित VNIT (Visvesvaraya National Institute of Technology), नागपूर येथे प्रवेश मिळविला. तिची इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (B.Tech.) या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली. होम स्टेट कोटा अंतर्गत SC-PwD प्रवर्गातून तीला हि संधी प्राप्त झाली.

तिने JEE Main परिक्षेत SC-PwD अखिल भारतीय क्रमांक १७५, CRL-PwD क्रमांक २,३९५, SC क्रमांक ७९,८४३ तसेच CRL क्रमांक ९,०१,७०३ प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेजची गुणवत्ता सिध्द झाली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे व प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे व मीरा पटेल, प्राचार्य नामदेव डांगे तसेच विभागप्रमुख विष्णूवर्धन महांकाली व प्रवीण उगले यांनी तिचे अभिनंदन केले.

दीक्षा राहुल अहिरे हिने नागपूर येथील VNIT नागपूरमध्ये प्रवेश मिळवीला. तीने शैक्षणीक जडणघडणीचे आणि या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना दिले आहे. हि आत्मा मालिक परिवारासाठी गौरवास्पद बाब आहे.
नंदकुमार सूर्यवंशी (अध्यक्ष, विश्वात्मिक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण)




