बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य, शहर स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य, शहर स्वच्छता अभियानाचा प्रारंभ
स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचा उत्साहात शुभारंभ
Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२६–कोपरगाव शहराला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर बनविण्याच्या उद्देशाने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात स्वच्छ शहर, सुंदर शहर या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता अभियानाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

या अभियानाच्या प्रारंभी परिसराची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. शहराच्या विकासासाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.स्वच्छ व निरोगी शहर घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी यावेळी केले.

स्वच्छतेची आवड असणारे नेतृत्व बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अभियानांतर्गत पुढील काही दिवसांमध्ये शहरातील सर्व १५ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय परिसर तसेच विविध भागांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, आरोग्य सभापती वैभव आढाव, दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे, नसीर सय्यद, राजेंद्र सोनवणे, अतुल काले, योगेश बागुल, विनोद राक्षे, संजय उदावंत, संदीप देवकर, रविंद्र कथले, डॉ. अमोल अजमेरे, फिरोज पठाण, स्वप्निल मंजुळ, विक्रमादित्य सातभाई, संतोष गंगवाल, वैभव गिरमे, गणेश आढाव, दिपक जपे, प्रतीक पगारे, संतोष शेजवळ, निसार शेख, गोपीनाथ गायकवाड, देवीदास रोठे, विजयराव गायकवाड, जयप्रकाश आव्हाड, राकेश काले, सतीश रानोडे, संतोष साबळे, चंद्रकांत वाघमारे, मुकुंद उदावंत, साई नरोडे, सलिम पठाण, लखन म्हस्के, इलियास खाटीक, राजेंद्र गंगुले, इरफान कुरेशी, रोहित आढाव, मुख्तार पठाण, ओविस मौलाना, बाळासाहेब सोनटक्के, हाजी फकीर मोहम्मद पहिलवान, रोहिदास पाखरे, शिवराम शिंदे, शाहरुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




