आपला जिल्हा
अमृतवाहिनीत रविवारी संगमनेर फुटबॉल फिव्हर २०२६ चे आयोजन

अमृतवाहिनीत रविवारी संगमनेर फुटबॉल फिव्हर २०२६ चे आयोजन
Sangmner vijay kapse दि १९ जुन २०२६–जगात सर्वाधिक देशांमध्ये खेळल्या जाणारा व सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची संस्कृती संगमनेर मध्ये विकसित व्हावी याकरता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी दुपारी 4.30 वा. अमृतवाहिनीतील नव्या स्टेडियम मध्ये भव्य फुटबॉल मॅचसह फुटबॉल फिव्हर 2026 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.







