आपला जिल्हा

के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न 

के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न 

के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न 

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ जुन २०२६- जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. बी. रोहमारे महाविद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. जावेद शाह यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योग आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा परिचय त्यांनी करून दिला.

जाहिरात

प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मनःशांती व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योग केला पाहिजे असे आवाहन केले.
क्रीडा शिक्षक प्रा. मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या सोबत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योग केला. अश्या अभूतपूर्व मिळालेल्या विलक्षण अनुभवाने विद्यार्थी भारावून गेले होते.  याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे