आपला जिल्हा

खेळाचे मैदानच तणावमुक्त, सशक्त आणि संस्कारी पिढी घडविण्याचे प्रभावी माध्यम-  सुमित कोल्हे

खेळाचे मैदानच तणावमुक्त, सशक्त आणि संस्कारी पिढी घडविण्याचे प्रभावी माध्यम-  सुमित कोल्हे


संजीवनी आयुर्वेद महाविद्यालयाचा ‘संजीवनी नेक्सस स्पोर्टस् फेस्ट-२०२६’ उत्साहात संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ जुन २०२६सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला नैराष्य , ताण-तणाव आणि विविध  मानसिक-शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत मैत्री, संघभावना, नेतृत्व, शिस्त तसेच यश-अपयश स्वीकारण्याची ताकद शिकवणारे खेळाचे मैदान हाच सर्वात प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी केले.
   संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली व सुमित   कोल्हे यांचे पुढाकारातून  संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ‘संजीवनी नेक्सस स्पोर्ट्स फेस्ट-२०२६’ या महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात   सुमित कोल्हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

जाहिरात

   या क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ संजीवनी अकॅडमी, वैजापूरच्या संचालिका निकिता कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे डायरेक्टर (नॉन-अकॅडमिक) डी. एन. सांगळे, एस.जी.ओ. आसिफ सय्यद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

  उद्घाटन प्रसंगी निकिता कोल्हे यांनी विध्यार्थ्यांना  खेळभावना, शिस्त आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती जपत संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले. खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण आणि संघभावना वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या महोत्सवात पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित एरो अपेक्स, अॅक्वा एवेंजर्स, इग्निस इन्फर्नो आणि टेरा टायटन्स या चार संघांची निर्मिती करण्यात आली होती. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा  या संघांमध्ये समावेश करण्यात आला होता.
चार दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात मैदानी व इनडोअर अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, दोरीखेच, रिले स्पर्धा, कॅरम आणि बॅडमिंटन यांसारख्या सांघिक स्पर्धांसह बुद्धिबळ, धावणे, पोहणे, बॅडमिंटन, रायफल शूटिंग, टेबल टेनिस आदी वैयक्तिक स्पर्धांमध्येही विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोप सोहळ्यात  विविध स्पर्धांतील विजेते व उपविजेत्या संघ तसेच खेळाडूंना ट्रॉफी, पदके व प्रशस्तीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. विध्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडा, संस्कार आणि नेतृत्व विकासालाही समान प्राधान्य देण्याच्या संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या ध्येय धोरणाचा प्रत्यय या महोत्सवातून पुन्हा एकदा आला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे