आपला जिल्हा

पढेगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान; दानशूरांकडून वारकऱ्यांवर सेवाभावाचा वर्षाव

पढेगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान; दानशूरांकडून वारकऱ्यांवर सेवाभावाचा वर्षाव

पढेगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान; दानशूरांकडून वारकऱ्यांवर सेवाभावाचा वर्षाव

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६:  महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून वारकरी पायी दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील माऊली पायी दिंडीचे नुकतेच भक्तिमय वातावरणात आणि विठूनामाच्या गजरात उत्साहपूर्ण प्रस्थान झाले.

जाहिरात

यावेळी विठ्ठल माऊलीच्या रथाचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर व माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पूजनानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषात दिंडीने पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू केले. संपूर्ण पढेगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

जाहिरात

दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक दानशूरांनी उदारहस्ते मदत केली. माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर यांनी वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून रेनकोटचे वाटप केले. तसेच माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ, भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, अशोक काळे, सूर्यभान करपे, चंद्रकांत शिंदे, शांताराम शिंदे, बाबुराव मापारी, रामदास शिंदे, किरण शिंदे, संजय शिंदे, बापू चव्हाण, बाबुराव साळवे, सुरेश शिंदे, माजी सरपंच संपत तरटे आदींनी वारकऱ्यांसाठी अल्पोहार व भोजनाची व्यवस्था केली.

जाहिरात

याशिवाय बाबासाहेब शिंदे व आदित्य संजयचंद यांनी एक क्विंटल साखर व चहा पावडर दान केली. ह.भ.प. भिंगारे महाराज, ह.भ.प. जगताप महाराज आणि दिलीप गिरे यांनी फराळाचे वाटप केले. सुदाम करपे यांनी दिंडीच्या रथासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला, तर बाबासाहेब भोसले यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावातील दानशूर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे पढेगावची सामाजिक बांधिलकी आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे