Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६–इस्कॉन कोपरगावच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै रोजी श्री जगन्नाथ रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता रथयात्रेला प्रारंभ होणार असून, भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.जाहिरात
रथयात्रा नगरपालिका चौक, भाजी मंडई, गुजरात रोड, अहिल्या चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नगरपालिका सार्वजनिक वाचनालय मार्गे पुढे जात महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल येथे सांगता होणार आहे.
या भव्य रथयात्रेत भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. शहरातील नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री सुंदर चैतन्य दास, इस्कॉन कोपरगाव यांनी केले आहे.जाहिरात
ही रथयात्रा भक्तिमय वातावरणात, हरिनाम संकीर्तन, भजन आणि आध्यात्मिक उत्साहात पार पडणार असून, कोपरगावकरांसाठी ही एक विशेष आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.जाहिरात