आपला जिल्हा

कोल्हे साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनाने गळीत हंगामाची तयारी

 कोल्हे साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनाने गळीत हंगामाची तयारी

कोल्हे साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनाने गळीत हंगामाची तयारी

Kopargaon vijay kapse दि १८ जुलै २०२६सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम शनिवारी चेअरमन आमदार विवेक कोल्हे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली.

जाहिरात

यावेळी आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत देशातील सहकारी साखर उद्योगात अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे उभारले आहेत. बायो-सीएनजी, पोटॅश ग्रॅन्युल खत निर्मिती, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन यांसारख्या प्रकल्पांबरोबरच सभासद शेतकऱ्यांच्या उस उत्पादनवाढीसाठी थेट बांधावर धडक मोहिम राबविण्यात येत आहे.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, गेल्या हंगामात बॉयलर, बॉयलिंग हाऊस आणि प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक आधुनिकीकरण करण्यात आले असून यंदा अधिकारी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आणि कामगारांनी समन्वयाने काम करून सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे. माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करून सभासद शेतकरी तसेच साखर उद्योगाशी निगडित सर्व घटकांची प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सीओओ शिवाकुमार, तांत्रिक सल्लागार सीमांचल पांडा, मुख्य अभियंता महंतेश तोडकर आणि उपमुख्य रसायनतज्ज्ञ हरेराम गोंड यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालक विश्वासराव महाले, त्र्यंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, बापूसाहेब बारहाते, विलासराव माळी, बापूराव औताडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार नेते मनोहर शिंदे, संभाजीराव बोरनारे, सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक बाळासाहेब वक्ते यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे