आपला जिल्हा

जुलै ऑफ काइंडनेस : देवकवठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद; “या चिमण्यांनो परत फिरा रे” उपक्रमातून संवर्धनाचा संदेश

जुलै ऑफ काइंडनेस;देवकवठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद; “या चिमण्यांनो परत फिरा रे” उपक्रमातून संवर्धनाचा संदेश

जुलै ऑफ काइंडनेस : देवकवठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद; “या चिमण्यांनो परत फिरा रे” उपक्रमातून संवर्धनाचा संदेश

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १८ जुलै २०२६ : समाजात सकारात्मकता, सहिष्णुता आणि आपुलकीची भावना वाढीस लागावी या उद्देशाने कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘जुलै ऑफ काइंडनेस’ उपक्रमांतर्गत रामाजी गेनुजी पाटील कहांडळ विद्यालय, देवकवठे येथील विद्यार्थ्यांनी “या चिमण्यांनो परत फिरा रे” हा उपक्रम राबवत पक्षी संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.

जाहिरात

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परिसरात तसेच शाळेच्या प्रांगणात चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी धान्य टाकून त्यांना पुन्हा गावाकडे परतण्याचे प्रेमळ आवाहन केले. तसेच आजी-आजोबांशी संवाद साधणे, आई-वडिलांना शेतीकामात मदत करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे अशा सामाजिक जाणीव वाढविणाऱ्या उपक्रमांमध्येही सहभाग घेतला.

जाहिरात

विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी एकत्र येऊन परिसरातील घनदाट झाडांभोवती पक्ष्यांसाठी दाणे टाकले. “या चिमण्यांनो परत फिरा रे” अशी सामूहिक साद घालत निसर्गगीत, बालगीते आणि बडबडगीते गात हा उपक्रम आनंदात साजरा करण्यात आला.

यावेळी संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संजय लहारे यांनी सांगितले की, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याची टंचाई आणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातील चिमण्या व इतर पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रसंगी शिक्षक शरद शेवंते, ज्ञानदेव गाडेकर, रंगनाथ वारुंगसे, आशा सूर्यवंशी, सुशीलकुमार गायकवाड, अब्दुल गनी पठाण, राजेंद्र चत्तर, संदीप सोनवणे, मंगेश देसाई आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात,  दुर्गा तांबे, तसेच स्कूल कमिटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, देवकवठे व मलढोण येथील ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे