आपला जिल्हा

राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास प्रशासकीय मान्यता

राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास प्रशासकीय मान्यता

राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास प्रशासकीय मान्यता

जाहिरात

 Rahata vijay kapse दि २१ जुलै २०२६राहाता शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास तसेच उर्वरित विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामामुळे व्यापारी संकुलाचे रूपडे बदलण्यास मदत होणार असून व्यापारी व नागरिकांना अधिक आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जाहिरात

भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून राहाता शहराच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने गती मिळत असून, शहराच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्याने मंजुरी मिळवून दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

जाहिरात

त्यांनी पुढे सांगितले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहाता नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हे काम मंजूर झाले आहे. या कामांतर्गत व्यापारी संकुलातील आवश्यक दुरुस्ती, नूतनीकरण आणि प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
या विकासकामांमुळे व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच संकुलात येणाऱ्या नागरिकांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, शहराच्या व्यापारी विकासाला नवी चालना मिळेल.

जाहिरात

प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या कामामुळे राहाता शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल तसेच व्यापारी संकुलाचा विकास शहराच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीलाही बळ देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे