आपला जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात भव्य महा रक्तदान शिबिर उत्साहात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात भव्य महा रक्तदान शिबिर उत्साहात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात भव्य महा रक्तदान शिबिर उत्साहात

Kopargaon vijay kapse दि २२ जुलै २०२६ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोपरगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य महा रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. समाजोपयोगी उपक्रमाला युवक, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जाहिरात

शिबिराला संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी भेट देऊन रक्तदात्यांशी संवाद साधला. रक्तदान हे केवळ सामाजिक सेवा नसून गरजू रुग्णाला नवजीवन देणारे श्रेष्ठ कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया, कर्करोग तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन अनेक युवक-युवती, महिला आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्साहाने रक्तदान केले.

जाहिरात

मा. आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे महा रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमातून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून सामाजिक ऐक्य, सेवाभाव आणि जनकल्याणाची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे