कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन
कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन
Kopargaon vijay kapse दि २२ जुलै २०२६: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी राज्याच्या विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान, प्रशासनातील त्यांची कार्यशैली तसेच जनतेशी असलेली बांधिलकी यांचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक गटनेत्या गौरी पहाडे, निर्मला आढाव, सोनम त्रिभुवन, राजेंद्र वाकचौरे, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, राहुल शिरसाठ, शैलेश साबळे, वाल्मिक लहिरे, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, बाळासाहेब आढाव, संदीप पगारे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, मायादेवी खरे, विजय त्रिभुवन, सोमनाथ आढाव, शुभम काळे, चंद्रकांत धोत्रे, राजेंद्र खैरनार, मनोज नरोडे, अरुण त्रिभुवन, सुनील फंड, वैशाली आभाळे, निता साबळे, विजय बंब, राहुल सोनवणे, सुनील मोकळ, सचिन परदेशी, जावेद शेख, राजेंद्र उशिरे, अंबादास वडांगळे, गणेश गोसावी, सिद्धार्थ शेळके, हारून शेख, प्रदीप कुऱ्हाडे, वैभव कानडे, दादा नाईकवाडे, राजेंद्र आभाळे, प्रशांत मोरे, विजय दाभाडे, मयूर राऊत, अजय लोखंडे, तन्मय साबळे, विकी चांदर, हर्षल जैस्वाल, एकनाथ गंगुले, संजय दुशिंग, विनायक सपकाळ, अमोल देवकर, ओम आढाव, सचिन बागले, योगेश वाणी आदी उपस्थित होते.



