आपला जिल्हा

शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येय साध्य करा : उपविभागीय पोलिस अधीक्षक अमोल भारती

शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येय साध्य करा : उपविभागीय पोलिस अधीक्षक अमोल भारती

शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येय साध्य करा : उपविभागीय पोलिस अधीक्षक अमोल भारती

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ जुलै २०२६ : “विद्यार्थी जीवनात शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे. व्यसनांपासून दूर राहून सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती  श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. संदीप वर्पे होते.

जाहिरात

अमोल भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशिक्षणामुळे शिस्त, संयम आणि आत्मविश्वास विकसित होतो. भरती प्रक्रियेचे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. शिक्षकांचे मार्गदर्शन आत्मसात करून त्याची प्रामाणिक अंमलबजावणी केल्यास यश निश्चित मिळते.
यावेळी एस. के. फिटनेस अकॅडमी, संगमनेरचे सागर खालकर यांनी पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप, शारीरिक तंदुरुस्ती, आहार, दैनंदिन नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. ज्ञानदा अकॅडमी, सिन्नरचे संचालक सुदाम शेळके यांनी करिअर नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आत्मा मालिक भरतीपूर्व अकॅडमीचे संचालक साईनाथ वर्पे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

जाहिरात

अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप वर्पे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत, या उद्देशाने महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अकॅडमी सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करत ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना शिस्त, आत्मविश्वास आणि आवश्यक कौशल्यांचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा प्रमुख हेतू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले, महेंद्रशेठ काले, प्रशिक्षक साजन चव्हाण, उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. घनश्याम भगत, डॉ. विशाल पवार, एस. आर. कदम यांच्यासह पोलीस भरतीसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय रवींद्र हिंगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिता अत्रे यांनी केले, तर आभार संदीप शिंदे यांनी मानले.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे