विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा; “विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण म्हणजे हुकूमशाही” – बाळासाहेब थोरात

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा; “विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण म्हणजे हुकूमशाही” – बाळासाहेब थोरात
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा; “विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण म्हणजे हुकूमशाही” – बाळासाहेब थोरात

Sangmner vijay kapse दि २२ जुलै २०२६ : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात गुरुवारी विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संगमनेर बसस्थानक ते महात्मा फुले स्मारक असा मोर्चा काढण्यात आला. मार्गात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. मोर्चात काँग्रेससह विविध समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती असल्याचा आरोप केला. लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी युवकांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

थोरात यांनी पुढे केंद्र सरकारवर टीका करत, जंतर-मंतरवरील आंदोलन, संसदेतील विरोधकांवरील निर्बंध, तसेच विद्यार्थी आंदोलनांवरील कारवाईचा उल्लेख केला. न्यायालये, स्वायत्त संस्था आणि लोकशाही व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर टीका केली. विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि आंदोलन दडपण्याच्या प्रकारांचा निषेध करत संबंधित जबाबदारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

मोर्चात दुर्गाताई तांबे, सचिन गुजर, अमोल बोराडे, अजित ओरा, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, ॲड. अमोल शेरकर, ॲड. रंजना गवांदे, निखिल पापडेजा, तुषार पानसरे, अनुराधा आहेर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनात काँग्रेस, युवा काँग्रेस, एनएसयूआय, छात्र भारती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज आणि विविध पुरोगामी संघटनांनी सहभाग नोंदविला.

हजारो नागरिकांचा सहभाग
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित या विराट मशाल मोर्चात संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.





