आपला जिल्हा

संवत्सरच्या पायी दिंडीत वारकऱ्यांची सेवाभावी सत्कारमूर्ती; युवकांकडून केळी व लाडूंचे वाटप

संवत्सरच्या पायी दिंडीत वारकऱ्यांची सेवाभावी सत्कारमूर्ती; युवकांकडून केळी व लाडूंचे वाटप

संवत्सरच्या पायी दिंडीत वारकऱ्यांची सेवाभावी सत्कारमूर्ती; युवकांकडून केळी व लाडूंचे वाटप

Kopargaon vijay kapse दि २५ जुलै २०२६आषाढी शुद्ध एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र संवत्सर ते श्री क्षेत्र सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम दरम्यान आयोजित भव्य पायी दिंडी सोहळ्यात संवत्सर गावातील युवकांनी वारकरी भाविकांना केळी व लाडूंचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श घालून दिला.

जाहिरात

शनिवार (दि. २५ जुलै) रोजी सकाळी ८ वाजता श्री क्षेत्र कमळादेवी मंदिर, संवत्सर येथून दिंडीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत हजारो वारकरी उत्साहाने मार्गक्रमण करत होते.
या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधत संवत्सर गावातील युवकांनी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी ऊर्जादायी लाडू व ताज्या केळींचे वाटप केले. निस्वार्थ सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या महाप्रसाद उपक्रमाचे वारकरी आणि उपस्थित नागरिकांनी मनापासून स्वागत केले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र परजणे, भाजप दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, भाजप पूर्व मंडळ युवा मोर्चाचे सदस्य सचिन शेटे यांच्यासह अनिल भाकरे, विजयराव काळे, चिमाजी दैने, दिनेश बोरनारे, मोहन निकम, अनुप शिंदे, योगेश परजणे, गणेश दैने, नरहरी साबळे, मच्छिंद्र परजणे, यादव दैने, गोकुळ मोरे, रवी सोनवणे, विशाल कासार, आप्पासाहेब रानोडे, युवा भाकरे, बाळासाहेब निरगुडे, सचिन भाकरे, योगेश भाकरे, जितेंद्र सोनवणे, सुजित सोनवणे, शंकर पुंड, श्लोक काळे, हेमंत काळे, किरण निरगुडे, संतोष कहाटे, आण्णासाहेब निरगुडे, लहानु गुंड, ज्ञानेश्वर निरगुडे, नानासाहेब सोनवणे, नाना ढेपले, गणेश कोताडे, ह.भ.प. कर्पे महाराज, राजेंद्र कापसे, राजेंद्र भोकरे, वैभव भोसले, शिवाजी घेर, अनिल हिंगे, पुंडलिक गिते, संदीप सोनवणे, धिरज कासार आणि रुषीकेश वरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

या सेवाभावी उपक्रमामुळे वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि भक्तीची परंपरा अधिक दृढ होत असून समाजात सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि अध्यात्मिक संस्कारांना बळ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दरम्यान, या स्तुत्य उपक्रमाचे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे तसेच युवा आमदार विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी विशेष कौतुक करत युवकांच्या सामाजिक व धार्मिक सेवाकार्याचे अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे