आपला जिल्हा

संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पहिलीच्या ५० व्या विद्यार्थ्याचा प्रवेश; चित्रकला कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बळावर राज्यात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सन १८७१ मध्ये २७ जुलै रोजी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक शाळेने १५५ वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास पूर्ण करत आणखी एका यशस्वी टप्प्याची नोंद केली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी इयत्ता पहिलीत सुजय सुनील भोसले या विद्यार्थ्याचा ५०वा प्रवेश करण्यात आला. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

जाहिरात

यावेळी कोपरगाव येथील कलाशिक्षक अमृतकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला कार्यशाळा घेतली. चित्र रंगविण्याच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक, रंगसंगती, कल्पकता आणि सर्जनशील अभिव्यक्ती याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर उधळण दिली.
संवत्सर जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच डिजिटल शिक्षण, कौशल्याधारित उपक्रम, संस्कारवर्ग, पर्यावरण संवर्धन, कला, क्रीडा आणि विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील आदर्श शाळा म्हणून मानाचे स्थान मिळविले आहे.

जाहिरात

या यशामागे शाळेचे मार्गदर्शक राजेश परजणे पाटील, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील तसेच ग्रामस्थ व पालकांचे लाभलेले मोलाचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत भावी वाटचालीचे उद्दिष्ट मांडले. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे १५५ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आनंद, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे