आपला जिल्हा

संजीवनीच्या १३ अभियंत्यांची एलटीआय माईंडट्रीमध्ये निवड; सॅप प्रमाणित प्रशिक्षणाचा लाभ; वार्षिक ५ लाखांच्या पॅकेजसह नोकरी

संजीवनीच्या १३ अभियंत्यांची एलटीआय माईंडट्रीमध्ये निवड; सॅप प्रमाणित प्रशिक्षणाचा लाभ; वार्षिक ५ लाखांच्या पॅकेजसह नोकरी

संजीवनीच्या १३ अभियंत्यांची एलटीआय माईंडट्रीमध्ये निवड; सॅप प्रमाणित प्रशिक्षणाचा लाभ; वार्षिक ५ लाखांच्या पॅकेजसह नोकरी

Kopargaon vijay kapse दि १ ऑगस्ट २०२६संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनी एलटीआय माईंडट्रीमध्ये वार्षिक ५ लाख रुपयांच्या आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. महाविद्यालयाला प्राप्त झालेला स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि सॅप (SAP) प्रमाणित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ही संधी मिळाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

जाहिरात

महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. ए. कापगते यांनी सांगितले की, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगजगताच्या गरजेनुसार अभ्यासक्रम राबविला जातो. महाविद्यालयाने बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी सॅप (Systems, Applications and Products in Data Processing) सोबत सामंजस्य करार केला असून, विद्यार्थ्यांना सॅप प्रमाणित प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या आधारे लार्सन अँड टुब्रो समूहातील एलटीआय माईंडट्री कंपनीने विद्यार्थ्यांची निवड केली.
या निवडीमुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९३० वर पोहोचली आहे.

जाहिरात

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचे हर्षल नंदलाल बच्छाव, निलम संतोष परंदे, आकांक्षा अप्पासाहेब बेल्हेकर, कल्याणी दिलीप कर्डे, सार्थक प्रदीप तनपुरे, तृप्ती नवनाथ ठोंबरे, अखिलेश उन्निकृष्णन आयनिक्कदन, समृद्धी प्रदीप सोनवणे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेचा प्रणव किशोर गागरे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचे सुमित जयवंत कोटमे, ईश्वरी योगेश माने, यशराज माधव शिंदे आणि धनश्री प्रदीप शिरोळे यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सॅप प्रशिक्षणाचे प्रभारी डीन डॉ. ए. बी. पवार यांच्या कार्याचेही कौतुक केले.

जाहिरात

संजीवनीतच सॅप प्रशिक्षणाची सुविधा
मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे म्हणाले, “मागील वर्षीही सॅप प्रमाणित प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी अशा कोर्ससाठी महानगरांकडे जातात. मात्र संजीवनीत पदवी शिक्षणासोबतच सॅपचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची मोठी बचत होत असून त्यांना उद्योगक्षेत्रात अधिक संधी मिळत आहेत.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे