आपला जिल्हा

अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

सी. व्ही. रमण परीक्षेत घवघवीत यश; तालुका व जिल्हास्तरावर उज्ज्वल कामगिरी

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १ ऑगस्ट २०२६महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शरयूताई देशमुख यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय सी. व्ही. रमण परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या बळावर विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या अंजली कन्नावार यांनी दिली.

जाहिरात

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड आणि संशोधनाची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातत्याने विविध विज्ञानाधारित उपक्रम राबविले जातात. याचाच परिणाम म्हणून राज्यस्तरीय सी. व्ही. रमण परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
इयत्ता पाचवीतील कु. श्रीमयी अमोल सानप हिने ८८.८८ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीतील चेतन भवरलाल गुर्जर याने ८० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर त्याच इयत्तेतील रुद्र भूषण बोऱ्हाडे याने ७४ टक्के गुण मिळवत तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला.

जाहिरात

इयत्ता आठवीतील विक्रांत प्रदीप कुटे याने ७४.६७ टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला, तर अर्चल नितीन वाळुंज हिने ७०.६७ टक्के गुणांसह तालुक्यात सहावा क्रमांक मिळवला. इयत्ता नववीतील पृथ्वीराज किरण नेहे याने ८२.६७ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

जाहिरात

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचे माजी शिक्षण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्या अंजली कन्नावार तसेच संस्थेच्या सर्व शिक्षक व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे