आपला जिल्हा

अमृतवाहिनी कृषी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न

अमृतवाहिनी कृषी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील ८५ संघांचा सहभाग; पुणे, फलटण व बारामतीच्या संघांचे विजेतेपद

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १ ऑगस्ट २०२६ : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (संगमनेर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ स्पर्धा (२०२६-२७) दि. ३० व ३१ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांमधील ५० बॅडमिंटन व ३५ टेबल टेनिस अशा एकूण ८५ संघांनी सहभाग नोंदविला.

जाहिरात

स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पार पडले. व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. बी. शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
उद्घाटन समारंभाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. व्ही. आर. आवारी, सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक अधीक्षक रतन आयरे, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाला संस्थेचे संचालक (अकॅडेमिक्स) डॉ. जे. बी. गुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जाहिरात

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
बॅडमिंटन (मुले): शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे
बॅडमिंटन (मुली): कृषी महाविद्यालय, फलटण
टेबल टेनिस (मुले): शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे
टेबल टेनिस (मुली): डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक डॉ. विशाल वाळे, प्राध्यापक, कर्मचारी, क्रीडा विभाग, विद्यार्थी स्वयंसेवक तसेच विविध समित्यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जी. बी. बाचकर यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक  श्वेता नागवडे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे