साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आ. विवेक कोल्हे यांचे अभिवादन; रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आ. विवेक कोल्हे यांचे अभिवादन; रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आ. विवेक कोल्हे यांचे अभिवादन; रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

Kopargaon vijay kapse दि १ ऑगस्ट २०२६: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक येथे अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित समाजबांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांनी डॉ. साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आ. कोल्हे म्हणाले की, डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक उभारणीसाठी शासनाने ठोस पावले उचलल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे जगातील पहिले डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी यावेळी आठवण केली.

जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आ. विवेक कोल्हे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. रक्तदान हे सर्वोत्तम सामाजिक कार्य असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




