आपला जिल्हा

एस.एस.जी.एमचे प्रा. धनंजय हांडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

एस.एस.जी.एमचे प्रा. धनंजय हांडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

 

एस.एस.जी.एमचे प्रा. धनंजय हांडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Kopargaon vijay kapse दि ३ ऑगस्ट २०२६– : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालय (एस.एस.जी.एम. कॉलेज), कोपरगाव येथील ज्युनिअर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्राध्यापक प्रा. धनंजय हांडे हे नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयात त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. हिरालाल महानुभाव उपस्थित होते. महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रा. धनंजय हांडे व सौ. स्वाती हांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री. हिरालाल महानुभाव यांनी प्रा. हांडे यांचे शिस्तप्रिय, प्रामाणिक, नियमबद्ध व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून कौतुक करत, सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा ज्ञानदानाचा प्रवास अखंड सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप वर्पे यांनी प्रा. हांडे यांच्या कार्याचा गौरव करताना, कामाप्रती निष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. त्यांचा शैक्षणिक प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. धनंजय हांडे यांनी आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभवांना उजाळा दिला. इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अध्यापनातील अनुभव, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका तसेच बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. आपल्या यशामागे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कुटुंबीयांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

जाहिरात

यावेळी श्री. राजेंद्र कुलकर्णी, प्रा. साळुंखे तसेच सौ. स्वाती हांडे यांनी प्रा. हांडे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

स्वागतपर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी सेवापूर्ती म्हणजे जीवनाचा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचे सांगत, उर्वरित आयुष्यातही ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा प्रा. हांडे यांना दिल्या.

जाहिरात

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे यांनी करून दिला. डॉ. सुनीता अत्रे व प्रा. ज्योती लामखेडे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. एम. डी. रेवगडे यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे