उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलची राज्यात दैदिप्यमान कामगिरी तब्बल २२८ विद्यार्थी पात्र; ९७ विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक गुण

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलची राज्यात दैदिप्यमान कामगिरी
तब्बल २२८ विद्यार्थी पात्र; ९७ विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक गुण
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलची राज्यात दैदिप्यमान कामगिरी
तब्बल २२८ विद्यार्थी पात्र; ९७ विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक गुण

Kopargaon vijay kapse दि ६ ऑगस्ट २०२६ : उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलने यंदाही राज्यस्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचे तब्बल २२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून राज्यात अव्वल कामगिरी करण्याची परंपरा कायम राखली आहे.
याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले की, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा अधिक, ७२ विद्यार्थ्यांनी २१० पेक्षा अधिक, तर ५४ विद्यार्थ्यांनी २२० पेक्षा अधिक गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

यामध्ये घनश्याम ढेपे २७६, श्रेयश धावडे २६०, शिवम जाधव २५८, साहिल पवार २५६, श्रीकांत कोटकर २५४, प्रथमेश सांगळे २५२, गितेश उधान २५२, कृष्णा धुमाळ २५०, स्वरा लांडगे २५० आणि आयुष वाळुंज २५० गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले.
या यशामागे प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
आत्मा मालिक पॅटर्नचे यश — नंदकुमार सूर्यवंशी
“शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलचे विद्यार्थी दरवर्षी राज्यात आघाडीवर असतात, याची प्रचिती यंदाही आली आहे. या यशामागे शिक्षकांची अथक मेहनत, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मा मालिक पॅटर्नची प्रभावी शैक्षणिक पद्धती कारणीभूत आहे. आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल राज्यात सातत्याने अव्वल कामगिरी करत असून हे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे यश आहे.”
— नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट



