डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते डोळासणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते डोळासणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप
डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते डोळासणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप

Sangmner vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोळासणे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेला भिंतीवरील घड्याळही भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला.

यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना, वाढदिवस, सत्कार किंवा इतर समारंभांवर होणारा अनाठायी खर्च टाळून तो शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी खर्च करावा, असे मत व्यक्त केले. अशा छोट्या मदतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागतो, असेही त्यांनी सांगितले. या प्रेरणेतून पठार भागातील सुमारे १५ ते १६ जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या कार्याला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमास दैनिक समर्थ गांवकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, मुख्याध्यापक गाडेकर, शिक्षक दिगंबर फटांगरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच अशा समाजाभिमुख उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना व्यक्त केली. उपस्थितांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.




