आपला जिल्हा

रशियातील शिक्षण-रोजगाराच्या संधींसाठी संजीवनी विद्यापीठ सज्ज

रशियातील शिक्षण-रोजगाराच्या संधींसाठी संजीवनी विद्यापीठ सज्ज

रशियाचे उप-वाणिज्यदूत मात्वेई फेटिसोव्ह यांची संजीवनी विद्यापीठास भेट; संयुक्त संशोधन, इंटर्नशिप व उच्च शिक्षणाबाबत सविस्तर चर्चा

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६ : रशियातील उच्च शिक्षण, संशोधन, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील रशियाच्या महावाणिज्य दूतावासातील उप-वाणिज्यदूत मात्वेई फेटिसोव्ह यांनी संजीवनी विद्यापीठाला भेट देत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या विविध शक्यतांवर सविस्तर चर्चा केली.

जाहिरात

यावेळी एपी ग्लोबलचे राजकीय व संस्थात्मक युतींसाठी धोरणात्मक प्रमुख शिवेंद्रसिंह चौहान आणि आर्थिक सल्लागार युगेन उपस्थित होते. संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते.

जाहिरात

डॉ. ए. जी. ठाकूर यांनी रशियन प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून संजीवनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाच्या संधी, उद्योगविश्वाशी असलेले संबंध आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय संधींची माहिती दिली.

“रशियातील विविध क्षेत्रांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,” अशी माहिती मात्वेई फेटिसोव्ह यांनी दिली. मात्र, रशियात शिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने रशियन भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी रशियन भाषेचे प्रशिक्षण घेऊन जागतिक संधींसाठी स्वतःला तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जाहिरात

संजीवनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकविली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फेटिसोव्ह यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय शिक्षण, कौशल्यविकास, इंटर्नशिप, संशोधन आणि रोजगारासाठी सक्षम करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

संजीवनी विद्यापीठाचे रशियातील विविध विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार असून त्याअंतर्गत विद्यार्थी रशियात जाऊन इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प तसेच उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रशियन प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठातील विविध विभाग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधून विद्यापीठातील कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या उपक्रमांची माहिती घेत त्यांचे कौतुक केले.

संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. अमित कोल्हे यांनी रशियाच्या मुंबई येथील महावाणिज्य दूतावासातील उप-वाणिज्यदूत मात्वेई फेटिसोव्ह यांचे स्वागत करून सत्कार केला.

रशियन विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असून, संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण व रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे